झुंजुमुंजू Early Morning.

2024 ж. 27 Нау.
104 Рет қаралды

आता वसंत ऋतू ची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. पिंपळ आणि तत्सम झाडांची पानगळ बऱ्याचशा प्रमाणात झालेली आहे आणि काही ठिकाणी सुंदर लुसलुशीत नाजूक पालवी फुटायला सुरुवात झाली आहे आणि पक्षी आपल्या सुंदर विश्वात रममाण होऊन झाडांवर बागडायला लागले आहेत. पक्षी साधारणपणे पावसाच्या अगोदर आपली घरटी बांधून पावसाळ्यात आपली पिल्ले काढायला तयारी करतात जेणेकरून त्यांना पावसाळ्यात पिल्लांना खाद्य शोधण्यासाठी फार सोपे जाते कारण पाणी साचल्यामुळे कीटक वगैरे आपसूकच त्यांना खाद्यासाठी तयार मिळतात. Early morning the Cuckoo has started singing which is the sign of early monsoon season this year.
अभिजात असलेल्या मराठी भाषेत काही अतिशय सुंदर, नादानुकारी शब्द आहेत. हे शब्द त्यांना मिळालेला अर्थ अगदी अचूकपणे दाखवतात की तिथे दुसरा अन्य शब्द लागू होऊ शकत नाही. मराठी संस्कृती आणि असे शब्द एवढे समरस झालेले आहेत की अभिजात मराठी भाषा सोडून अन्य भाषांमध्ये त्यांना नेमका पर्याय उपलब्ध होत नाही.
झुंजुमुंजू असाच एक शब्द आहे. पहाट होण्याआधीची जी किंचित अंधार, थोडा थोडा उजेड अशी जी वेळ असते तिला अभिजात मराठीत झुंजुमुंजू झालं असं म्हणतात. हा शब्द उच्चारला की मराठी माणसाच्या डोळयासमोर ती वेळ साक्षात उभी राहते. गावाकडचं वातावरण आहे. उन्हाळा सुरु झाला आहे. पानगळ संपली आहे. झाडांना पालवी फुटायला लागली आहे. पहाटे हवेत किंचित थंडी जाणवत आहे. हलका वारा, पक्ष्यांचे विविध आवाज, गाई गुरांच्या हंबरण्याचा आवाज, नव्या पानांचा गोडसर वास, लांबून ऐकू येणारी देवळातील काकड आरती,चुलीतील सरपणाचा खरपूस वास आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे हलकेच आपल्याला आलेल्या जागेमुळे आकाशात अजूनही एका कोपऱ्यात चंद्राच्या कोरे चे दर्शन होत असते. थोडा अंधार असला तरी आसमंत जागा व्हायला लागलेला असतो. तीच असते झुंजुमुंजू ची वेळ. हे सगळं आपल्या मनचक्षूसमोर दिसण्याची ताकद त्या एकट्या शब्दात आहे.आपण जगाच्या पाठीवर कुठेही असोत झुंजुमुंजू शब्द उच्चारताच मराठी माणसाला आपली माती, आपली मातृभाषा, आपली संस्कृती आठवल्याशिवाय राहत नाही. हीच आहे आपल्या अस्सल मराठमोळ्या शब्दांची महती.

KZhead