श्रीरामाची पालखी मिरवणूक १८ एप्रिल २०२४.१८३वे वर्ष. केशवाश्रम.महिकावती/माहीम पिनकोड ४०१४०२.Pin401402

2024 ж. 18 Сәу.
386 Рет қаралды

महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक महिकावती ऊर्फ के.माहीम ऊर्फ माहीम गावात असलेल्या केशवाश्रमात श्री राम जन्मोत्सवाच्या १८३ व्या वर्षाच्या कार्यक्रमात श्रीरामाची पालखी मिरवणूक.
श्रीराममंदिर,महिकावती /माहीम पिनकोड ४०१४०२.
हे मंदिर माहीम-वडराई रस्त्यावर एसटी बसच्या राममंदिर बसथांब्यापासून डावीकडे १०० मीटरवर स्थित आहे. पालघरवरून वडराईला जाणाऱ्या एसटी बसेस येथे थांबतात.सातपाटी, शिरगाव तसेच पालघर वरून रिक्षानेसुद्धा येथे येता येते.
श्रीराममंदिर माहिती.
शके १७६३ वैशाख महिन्यात शुद्ध तृतीयेला श्रीराम,लक्ष्मण,सीता,रामदूत हनुमान आणि विघ्नहर्ता गजाननाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा श्रीराममंदिरात झाली.
शके १७६४ चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्रीराम जन्मोत्सव साजरा होऊ लागला.
पूर्वी प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत रामजन्म उत्सव साजरा केला जात असे.प्रतिपदेपासून रोज सकाळी सनई-चौघड्याच्या मंदमधुर आवाजात पूजा आरती केली जात असे आणि रात्री रामायण महाभारतातील विषयावर कीर्तन आयोजिले जात असे.दुपारच्या सत्रात भजन, प्रवचन इत्यादी धार्मिक कार्यक्रम सादर होत असत. अखंड नामस्मरणसोहळा सुद्धा ह्याच पंधरवड्यात संपन्न होत असे.अखिल भारतीय पातळीवर प्रसिद्ध असलेले कीर्तनकार प्रवचनकार बोलाविले जात असत.श्रीरामजन्माचे कीर्तन पूर्वी ह.भ.प. वडगावकरबुवा,चौधरी बुवा, आणि नंतर भुवनेश्वर महाराजांचे सुपुत्र अशोक महाराज करीत असत.
कालपरत्वे बदल झाले.हल्ली वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार येतात.रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रामाची पालखी काढली जाते ती रात्रभर संपूर्ण गावात फिरविली जाते व सकाळी राममंदिरात आणली जाते आणि चहापानानंतर उरलेल्या वडराई भागात फिरविली जाते.चिंचणी, डहाणू, वरोर,धाकटी दमण,मोठी दमण, तारापूर, वसई,मुंबई, नाशिक, वडगाव,पुणे, मुरबे,सातपाटी, शिरगाव,माकुणसार, एडवण, दातिवरे,कोरे, मथाणे वगैरे लांब लांब ठिकाणाहून भाविक नित्यनेमाने दरवर्षी येतात.रामजन्मउत्सवाची समाप्ती शेवटच्या दिवशी तीर्थप्रसादाने संपन्न होते. नंतर भाविक लोक आपआपल्या गावी परततात.रामनवमी उत्सवाप्रमाणेच प्रत्येक वर्षी आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. तसेच दरवर्षी २१ जुलैला भुवनेश्वर महाराजांची पुण्यतिथी पाळली जाते.
सौजन्य : मराठी विकिपीडिया.
Shri Ram Mandir 183 rd year of celebration of Ram Janmotsav.
Shri Ram Palkhi Procession

Пікірлер
  • 🌹🙏

    @patilskitchenvlog@patilskitchenvlog25 күн бұрын
    • Thanks!

      @nareshsave@nareshsave25 күн бұрын
    • खूप खूप धन्यवाद.

      @nareshsave@nareshsave22 күн бұрын
KZhead